वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार युवा नेतृत्व करणदादा देवतळे यांच्या कार्यतत्परतेतून कश्यप लेआउट (पंचमुखी हनुमान मंदिर परिसर) येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सन २०२५-२०२६ च्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ट्यूबवेलचे (बोअरवेल) आज भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
🔴 पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली 🔴
या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार करण दादा देवतळे यांनी तात्काळ आपल्या निधीतून या कामाला मंजुरी दिली. या विकासकामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
🔴 मान्यवरांची उपस्थिती 🔴
सदर ट्यूबवेलचे भूमिपूजन वरोरा भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोषजी पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की, “आमदार करणदादा देवतळे यांच्या माध्यमातून वरोरा शहराचा कायापालट होत असून, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.”
याप्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
👉 माकोडे साहेब (विश्वस्त)
👉उमेशजी सिंग साहेब
👉 मोरया साहेब
👉 जितेंद्र काळे साहेब
👉उमरे साहेब
👉साळवे साहेब
👉घूगल साहेब
यावेळी कश्यप लेआउटमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आमदार महोदयांच्या या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
🙏 जय विदर्भ 🙏




