Home राजकारण स्वर्गीय संजयजी देवतळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रुग्णांसाठी मोफत ‘टिफिन सेवा’ सुरू

स्वर्गीय संजयजी देवतळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रुग्णांसाठी मोफत ‘टिफिन सेवा’ सुरू

वरोरा :- २५ एप्रिल २०२६
समाजसेवेचा वसा पुढे चालवत, स्वर्गीय संजयजी देवतळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आजपासून रुग्णांसाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘आमदार करणदादा देवतळे मित्र परिवारा’च्या वतीने शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांसाठी ही ‘मोफत टिफिन सेवा’ कार्यान्वित करण्यात आली आहे.
‘रुग्णसेवा हीच खरी सेवा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून, स्वर्गीय संजयजी देवतळे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जेवणाची सोय करणे कठीण जाते, ही बाब लक्षात घेऊन या टिफिन सेवेद्वारे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
🛑 संपर्क आणि माहिती 🛑
या उपक्रमाचा लाभ गरजू रुग्णांना घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी किंवा या सेवेबाबत संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
👉 आ. करणदादा देवतळे कार्यालय  ☎️८९२३३३०८८८
👉 राहुल बांदुरकर ☎️ ९७६६०६५००१
गरजू रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर जेवण उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
🙏 जय विदर्भ 🙏