वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
नागरी-हिंगणघाट रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक १९ वर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या (Flyover) आणि अंडरपासच्या धिम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पुलाचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे लेखी आश्वासन मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने दिले आहे.
🙏 नेमके प्रकरण काय 🙏
गेल्या दोन वर्षांपासून नागरी-लाडकी रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने नागरी आणि परिसरातील गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थी आणि रुग्णांना या मार्गावरून प्रवास करताना जीवघेणी कसरत करावी लागते. या गंभीर समस्येची दखल घेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून हे काम तातडीने पूर्ण करण्याची आणि तोपर्यंत पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती.
🙏रेल्वे प्रशासनाचे उत्तर🙏
अहीर यांच्या पत्राला उत्तर देताना नागपूर मंडळाचे अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक (ADRM) अरुण कुमार सिंह यांनी सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. पत्रात नमूद केल्यानुसार:
👉 सेवाग्राम-बल्लारशाह सेक्शनमधील येनोर-नागरी स्थानकादरम्यान गेट क्र. १९ वरील पुलाचे काम 👉MRIDC मार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.
👉 सध्या या मार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
👉 करारातील अटींनुसार, या संपूर्ण प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
🙏नागरिकांची मागणी आणि पाठपुरावा🙏
या पुलाच्या कामासाठी नागरी येथील सुरज धात्रक आणि इतर रहिवाशांनी सतत पाठपुरावा केला होता. रेल्वेने दिलेल्या या नव्या डेडलाईनमुळे आता कामाला गती मिळेल, अशी आशा परिसरातील जनतेला लागली आहे. रेल्वे प्रशासनाने वेळेत काम पूर्ण न केल्यास आगामी काळात संताप व्यक्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
🙏 जय विदर्भ 🙏




