Home जिल्हा विजय मोकाशी यांची वरोरा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

विजय मोकाशी यांची वरोरा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

वरोरा : – तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या ‘खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित, वरोरा’ च्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये श्री. विजय मोकाशी यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अरुणजी खारकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राची लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे , रवींद्रजी शिंदे, डॉ. विजयजी देवतळे, साहेबराव ठाकरे, जयंत टेमुर्डे, विजयजी पावडे, बापूजी नोकरकार, बाळूजी भोयर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान सोहळा अधिक प्रेरणादायी ठरला.म्हणून  या निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🔴 अनुभवी नेतृत्वावर विश्वास विजय मोकाशी🔴 यांचा सहकार क्षेत्रातील गाढा अनुभव आणि जनसंपर्क लक्षात घेता, संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल या विश्वासाने त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकृतरीत्या त्यांच्या नावाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला.
**शेतकऱ्यांचे हित जोपासणार: विजय मोकाशी** अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना श्री. मोकाशी म्हणाले की, “संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. सभासदांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, त्याला तडा जाऊ न देता संस्थेच्या हितासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय मोकाशी यांच्या निवडीबद्दल वरोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे स्वागत केले जात आहे.
⭕ शुभेच्छुक ⭕
*स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल आणि समस्त वरोरा वासी.
🙏 जय विदर्भ 🙏