वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त खांबाळा-सालोरी मंडळातर्फे सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. करणभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रतिमा पूजन
कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, माँ भवानी आणि भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आला. ‘भारत माता की जय’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार
भाजपाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी या वेळी विशेष सोहळा रंगला. पक्षाचे ज्येष्ठ सदस्य श्री. विजयजी बालपांडे, श्री. अशोकराव ताजणे आणि तंटामुक्ती अध्यक्ष श्री. भोयर साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी भाजपाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
🛑 श्री. राजेंद्र सवाई (भाजपा मंडळ अध्यक्ष)
🛑 श्री. सुरज धात्रक (युवा मोर्चा अध्यक्ष)
🛑 श्री. चंद्रशेखर नौकरकर (भाजपा तालुका महामंत्री)
🛑 श्री. बाळासाहेब भोयर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती)
🛑 श्री. विजयजी मोकाशी, श्री. राजू पाटील लडके
🛑 श्री. शेळकी साहेब (माजी सरपंच), डॉ. राऊत साहेब 🛑 श्री. प्रकाश झाडे, श्री. दिवाकर नन्नावरे
⭕ उत्स्फूर्त प्रतिसाद ⭕
कार्यक्रमाचे नेटके संचालन भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आकाश भांडे यांनी केले. या स्थापना दिनानिमित्त खांबाळा परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्याचा” निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
🙏 जय विदर्भ 🙏




