Home जिल्हा दिल्लीमध्येही चंद्रपूरच्या प्रश्नांसाठी आक्रमक पाठपुरावा : हंसराज अहीर यांच्या कार्याचा आढावा

दिल्लीमध्येही चंद्रपूरच्या प्रश्नांसाठी आक्रमक पाठपुरावा : हंसराज अहीर यांच्या कार्याचा आढावा

 

चंद्रपूर : माजी खासदार हंसराज (भैय्या )अहिर हे सध्या खासदार नसतानाही चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी दिल्ली दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे पाठपुरावा करून चंद्रपूर जिल्ह्यासाठी आरोग्य व विकासाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

माजी खासदार हंसराज (भैय्या ) अहीर यांनी विशेषतः CGHS, DEIC आणि ICMR सारख्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधा चंद्रपूरमध्ये सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनीही त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, संशोधन व उपचारांची सोय स्थानिक पातळीवर निर्माण व्हावी,या उद्देशाने हंसराज (भैय्या )अहीर यांनी दिल्लीमध्ये अनेक बैठका घेऊन संबंधित मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, सध्या लोकप्रतिनिधी नसतानाही क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून विकासकामांसाठी त्यांची आक्रमक भूमिका कायम असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते.

आरोग्य सुविधा, पायाभूत विकास आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ चंद्रपूर जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी हंसराज( भैय्या )अहीर यांचे प्रयत्न सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

🙏जय विदर्भ🙏🏻