Home जिल्हा ⭕ वरोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक. 2 सामूहिक पक्ष प्रवेशा मुळे विकास यात्रेला...

⭕ वरोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक. 2 सामूहिक पक्ष प्रवेशा मुळे विकास यात्रेला नवीन गती ⭕

 

वरोरा  : ✍️( अभिषेक भागडे )नगरपरिषद प्रभाग क्र. २ मध्ये आज भारतीय जनता पार्टीत झालेल्या सामूहिक पक्षप्रवेशामुळे प्रभागातील विकास, ऐक्य आणि जनविश्वासाची वाटचाल अधिक वेगवान झाली. प्रभागातील तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध स्तरातील नागरिकांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाभिमुख दृष्टिकोनावर दाखवलेल्या विश्वासामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले.

या कार्यक्रमात आमदार करणदादा देवतळे यांच्या विकासाभिमुख, पारदर्शक आणि जनहितकारी नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत,बाळु भाऊ पिसाळ,
वैभवजी लोहकरे आणि सौ. वर्षाताई मंगेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची सदस्यता स्वीकारली.

यामध्ये प्रमुखतः —  कार्तिक विरुटकर,  सूरज निखाते, भारत लोहकरे, प्रणय पोद्दार, संदीप येणगंदेवार, नासेन तितरे, अंकुश नाईक, सुयोग धोपटे, सौरभ मोरे, प्रथम हरणे, हर्ष लोहकरे, प्रदीप दुर्गे, आशिष डोंगरे, कार्तिक विरूटकर, गणपत मरासकोल्हे, मंगेश निखाडे, मनीष भगत, आदित्य पेंदोर, सुमीत फुलझेले, गोलू येलके आणि दिनेश ढुमने
या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

भाजप प्रवेशानंतर उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की —
प्रभाग क्र. २ मध्ये विकासाला गती, पारदर्शकता आणि जनसंपर्क यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.
सामूहिक प्रवेशामुळे प्रभागातील संघटन अधिक मजबूत होऊन आगामी निवडणुकीत निर्णायक बदल घडवण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे.

प्रभागातील नागरिकांमध्ये आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या कार्यकर्त्यांनीही विकास, सेवा आणि पक्षनिष्ठा यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेवटी, प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने घोषवाक्य दिले—
“विकासाची रास्त दिशा… प्रभाग २ भाजपसोबत एकदिलाने पुढे!”

हा सामूहिक पक्षप्रवेश प्रभागातील समन्वय, ऐक्य आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.—🙏 जय विदर्भ🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क- साधा. ☎️9673574711☎️8329889732 )