⭕ चरुर-खटी व वनोजा परिसरातील नागरिकांचा रस्त्यासाठी निवेदन ⭕

वरोरा-✍️( अभिषेक भागडे) ऐकोना,चरुर-खटी,वनोजा परिसरातील नागरिकांनी आज स्थानिक प्रशासनाकडे अपूर्ण व दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांच्या तातडीने दुरुस्ती-निर्माणासाठी निवेदन सादर केले. सदर निवेदन हे भद्रावती-वरोरा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण दादा देवतळे यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले. तसेच नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत तातडीचे उपाययोजना करण्याची मागणी केली.

निवेदन देण्यासाठी एकोना, चरूर-खटी, वनोजा गावातील खालील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते—
चंद्रशेखर पहापाळे, महारत्न लोहकरे, शुभम बोथले, स्वप्निल भडके, हेमंत घुगल, सुनील ठावरी, आकाश मेश्राम, अनिकेत उताणे, प्रवीण भडके, प्रेमकुमार घुगल, गणेश ढेगळे, प्रवीण मेश्राम, संकेत नान्ने, लोभानंद भडके, सुनील मेश्राम, प्रशांत मोडक, गजानन चौधरी यांच्यासह चरुर-खटी व वनोजा गावातील अनेक नागरिक सहभागी झाले.

नागरिकांनी निवेदनात पुढील प्रमुख मुद्दे मांडले—

  • रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, खड्ड्यांमुळे वाढते अपघात व हालअपेष्टा
  • विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना होणारा मोठा त्रास
  • पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीषण परिस्थिती
  • रस्ता तातडीने दुरुस्त करून दर्जेदार पद्धतीने बांधण्यात यावा अशी मागणी

नागरिकांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहील, असा इशाराही दिला.

स्थानिक नागरिकांनी एकजुटीने निवेदन देत आपला हक्काचा रस्ता मिळवण्यासाठी दृढनिश्‍चय व्यक्त केला असून आता प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिराती करिता संपर्क साधा. ☎️9673574711☎️8329889732 )