नाशिक: नाशिक व दिंडोरी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार हे निवडून येतील त्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन शेवटच्या दोन दिवसाची रणनीती आखण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी दिली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मागील तीन-चार दिवसापासून नाशिक मध्ये तळ ठोकून आहेत नाशिक व दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी म्हणून रणनीती करण्यामध्ये गिरीश महाजन हे अग्रेसर आहेत या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी म्हणून आता शुक्रवारी गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली .या दोन्हीही नेत्यांमध्ये सुमारे दोन तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही दोन तासापासून दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील विविध नेते जेष्ठ नागरिक यांच्याशी फोनवर द्वारे संपर्क साधून एकूण परिस्थितीचा आढावा घेत होतो काही कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात येत होत्या आणि यासाठी म्हणून मी छगन भुजबळ यांच्याकडे आलो होतो या सर्व रणनीती वरती आम्ही चर्चा केली रणनीतीचा भाग म्हणून फोन करण्यात आले तसेच काही जणांना प्रत्यक्ष देखील भेटणार आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना सक्रिय करून महायुतीच्या विजया वरती शिक्का मोर्तब करणार आहे.



