Home Breaking News IN the slaughterhouse : नेण्यात आलेल्या 22 जनावरांची सुटका

IN the slaughterhouse : नेण्यात आलेल्या 22 जनावरांची सुटका

 16 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त

भंडारा : कत्तलखान्यात नेणाऱ्या 22 जनावरांची सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले. या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 1 लाख 75 हजार रुपये किमतीची 22 जनावरे असा एकूण 16 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी ट्रक मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ट्रकमध्ये 22 जनावरे क्रूरपणे भरून नेली जात होती. पोलिसांनी वाहन थांबवून तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेबाबत आरोपी चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.