Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिफेकांवर निर्बंध;...

चंद्रपूर जिल्ह्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिफेकांवर निर्बंध; पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश.

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि विसर्जन यांसारखे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. दिनांक  ०५/०९/२०२६ (रात्री २०.०० वा.) ते २३/०९/२०२६ (रात्री २४.०० वा.) या कालावधीत सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. आयुष्य आपु यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ आणि कलम ३७(१) अन्वये विशेष निषेध व मनाई आदेश जारी केले आहेत.



💥  प्रमुख निबंध व नियम 💥
1. लेझर लाईटवर पूर्ण बंदी (कलम ३६ अन्वये) मिरवणुकीदरम्यान Lazer Light, तीव्र तीव्रतेचे Flash Light व मानवी डोळ्यांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकारी / सक्षम अधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करू शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील.
2. ध्वनिवर्धक व DJ वापराबाबतचे नियम (कलम ३७(१) अन्वये)
लेखी परवानगी अनिवार्य :- सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक, लाउडस्पीकर, ऑम्प्लिफायर वापर करता येणार नाही.
डी.जे. व मॉडिफाइड साऊंड सिस्टीमवर बंदी :- डी.जे., प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साऊंड इक्विपमेंट, वुफर, सक्‍वुफर, यांसारख्या अत्यंत तीव्र व हानिकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णत: बंदी राहील.
शांतता क्षेत्र :- रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांसारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
3. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण बंदी :- रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ध्वनिवर्धक व डी.जे. वापरण्यास सक्त मनाई राहील (जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस / वेळ वगळून).
परिसरनिहाय ध्वनी तीव्रता मर्यादा (डेसिबल – db) क्षेत्र कोड | क्षेत्राचा/विभागाचा प्रकार  दिवसा मर्यादा | रात्री | मर्यादा औद्योगिक क्षेत्र | ७५ db | ७० db | व्यावसायिक क्षेत्र | ६५ db | ५५ db निवासी क्षेत्र | ५५ db | ४५ db | शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) | ५० db | ४० db | नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कठोर कारवाई साहित्य जप्ती व कायदेशीर कारवाई :- नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३० अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा / उपकरणे जप्त केली जातील.



अटक व खटला :-  आयोजक, ऑपरेटर किंवा वाहन चालक विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ७२(२) अन्वये वॉरंटशिवाय अटक केली जाऊ शकते तसेच कलम १३४, १३६ अन्वये न्यायालयात घटना दाखल केला जाईल.
चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, उत्सव मंडळे व आयोजकांना शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.