चंद्रपूर :- देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साही, मंगलमय आणि आत्मीय वातावरणात पार पडला. या पावन प्रसंगी उपस्थित लाडक्या माता-भगिनींनी श्री. अहिर यांना राखी बांधून औक्षण केले, यावेळी त्यांनी भगिनींचे शुभाशीर्वाद स्वीकारत सर्वांना सदिच्छा दिल्या.
या आनंददायी प्रसंगी शेतकऱ्यांचा खरा सखा, कष्टाचा सोबती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाणारी ‘बैलजोडीची देखणी प्रतिकृती’ आदरणीय हंसराजभैय्या अहिर यांना सस्नेह भेट देण्यात आली, ज्यावर त्यांनी विशेष समाधान व्यक्त करत शुभाशीर्वाद दिले.
सभापती राजू डोंगे यांच्या यशस्वी कार्यकाळाचा सत्कार
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे यांनी आपल्या पदाचा १ वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल हंसराज अहिर यांच्या हस्ते त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
🙏 दिग्गजांची लक्षणीय उपस्थिती🙏
या दिमाखदार सोहळ्याला चंद्रपूरचे आमदार किशोरजी जोरगेवार, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवीभाऊ शिंदे, चंद्रपूरच्या महापौर सौ. संगीताताई खांडेकर, अशोकजी जीवतोडे, रघुवीरजी अहिर, तुषारजी सोम, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे, संजय उमरे, प्रवीणभाऊ सातपुते, रमेशजी मेश्राम यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




