Home जिल्हा आनंदवनातील मूकबधिर व अंध विद्यालयात रोटरी क्लब वरोराच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात संपन्न.

आनंदवनातील मूकबधिर व अंध विद्यालयात रोटरी क्लब वरोराच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात संपन्न.

वरोरा :- मानवतेचा संदेश देणाऱ्या आनंदवन परिसरातील ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ येथे वरोरा रोटरी क्लबच्या वतीने रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने हा पवित्र सण साजरा केला.
या प्रसंगी रोटरी क्लबतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे (स्कूल बॅग ), अभ्यासासाठी लागणाऱ्या विविध आवश्यक वस्तू, चॉकलेट्स आणि फळांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. दिव्यांग आणि अंध विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.



कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी मोठ्या ओढीने रोटरीच्या सदस्यांना राख्या बांधल्या, ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. या सुंदर व बहारदार कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत मणियार, अभिजीत बोथले, सुनील आयचीत, योगेश डोंगरवार, चेतन बजाज यांच्यासह रोटरी क्लबचे इतर बहुसंख्य सदस्य आवर्जून उपस्थित होते. सदस्यांच्या उपस्थित रोटरीच्या या समाजोपयोगी उपक्रमाने आनंदवनातील विद्यार्थ्यांना एक वेगळाच आपलेपणा व आपुलकीचा अनुभव मिळवून दिला.