Home जिल्हा चंद्रपूर-आर्णीच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे निवेदन; वरोरा शहरात धोकादायक शाळा व...

चंद्रपूर-आर्णीच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे निवेदन; वरोरा शहरात धोकादायक शाळा व पाण्याच्या टाकीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

वरोरा :- शहरातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि नागरिकांचे प्राण सध्या धोक्यात सापडले चित्र दिसत आहेत.वरोऱ्यात नवीन पाण्याच्या टाकीला लागूनच असलेली अत्यंत जीर्ण झालेली जुनी पाण्याची टाकी, तसेच अभ्यंकर-इंदिरा गांधी शाळा, उर्दू शाळा आणि शहरातील इतर शाळांच्या इमारती पूर्णपणे धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. कधीही एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असतानाही प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. या अत्यंत संवेदनशील विषयाची तात्काळ दखल घेत नगर परिषद वरोऱ्याच्या नगरसेविका  सौ. रोशनी संदीप भडके यांनी आक्रमक भूमिका घेत चंद्रपूर-आर्णी लोकसभा च्या लोकप्रिय खासदार  प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदन सादर केले आहे.



विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ या धोकादायक वास्तूंची पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात किंवा तातडीने हे धोकादायक बांधकाम जमिनदोस्त करावे, अशी मागणी सौ. रोशनी संदीप भडके यांनी केली आहे. या बाबीकडे प्रशासनाने विशेष लक्ष करावे.