चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा कारागृहात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटरीयन म्युझिशियन्स (IFRM) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन व भावगीतांच्या कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. कारागृहातील बंदी बांधवांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून सुरेल गीतांचा नजराणा सादर करण्यात आला.
🙏 मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम संपन्न🙏कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अर्चना उचके आणि माजी अध्यक्ष संदीप रामटेके, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, शिक्षक कमलाकर मिराशे, संजीव हटवाडे, या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक म्हणून मनीषा पडगिलवार व सौ.आसावरी विजय देवतळे यांनी प्रामुख्याने जबाबदारी पारपाडली आहे. या कार्यक्रमाला महिला भगिनी उपस्थित होत्या.
🙏 संस्कृती आणि संगीताचा अनोखा संगम 🙏रक्षाबंधन सुरू असताना IFRM च्या वतीने सप्तसुरांचे रंग उधळत, विविध रागांच्या मधुर स्वरात आनंद व चैतन्याची उधळण करत सुमधुर मराठी व हिंदी गीतांचा अनुपम नजराणा सादर करण्यात आला.
कलाकारांचे दमदार सादरीकरण :- कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती मनिषा पडगिलवार यांनी “सुरज की गर्मी से तपते हुए तन को मिल जाये तरवर की छाया” या गाण्याने केली. त्यानंतर डॉ. सुनील मल्लोजवार, जितेन्द्र जनबंधु, वृषाली डेकाटे, पल्लवी चंदावार, निता जनबंधु, ज्योती रामटेके, राजेश गन्नारवार, मनिष बोराडे, कमलाकर मिराशे, संदीप जोशी आदी कलावंतांनी उत्कृष्ट गीतांचा नजराणा प्रस्तुत केला.
💥 पदाधिकारी :- रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्ष स्मिता जीवतोडे, सचिव विशाल खांडरे तसेच IFRM च्या चेअरमन मनिषा पडगिलवार आणि सचिव डॉ. सुनील मल्लोजवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला.
💥 प्रेरणादायी मार्गदर्शन :- अध्यक्षाीय भाषणात कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी बंदी बांधवांना रक्षाबंधन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व “ये भी दिन निकल जायेंगे अच्छे दिन आएंगे” असे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, कमलाकर मिराशे, संजीव हटवाडे, महेंद्र हिरोळे, शिवशंकर खंडारे, नरेंद्र दशमवार, परेश जगनाडे, कु. स्वाती सहारे, कु. प्रगती वानेवार व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका ठाकरे यांनी केले.




