Home विदर्भ कमळ फुलणार, प्रत्येक बूथ जिंकणार! यवतमाळ जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक SIR आढावा बैठक...

कमळ फुलणार, प्रत्येक बूथ जिंकणार! यवतमाळ जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक SIR आढावा बैठक दिमाखात संपन्न.

पांढरकवडा :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आर्णी-केळापूर व वणी विधानसभा मतदारसंघाची अत्यंत महत्त्वाची संघटनात्मक ‘SIR आढावा बैठक’ पांढरकवडा येथील माऊली सेलिब्रेशन हॉल येथे अत्यंत उत्साही आणि दणदणीत वातावरणात पार पडली. भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लजी चौहान यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.



🙏 दिग्गजांचे तडाखेबंद मार्गदर्शन 🙏
या बैठकीत SIR चे राष्ट्रीय सह-संयोजक तथा महाराष्ट्र प्रभारी आ. भगवानदासजी सबनानी यांनी प्रमुख मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. यावेळी त्यांच्यासोबत आर्णी-केळापूरचे माजी आमदार प्रा. राजुभाऊ तोडसाम, वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डीजी बोदकुरवार, पांढरकवडाचे नगराध्यक्ष आतिश बोरले आणि वणीच्या नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांची विशेष उपस्थिती लाभली होती.



💥बैठकीतील कळीचे मुद्दे आणि आक्रमक रणनीती💥
संघटन आढावा :- आर्णी-केळापूर व वणी मतदारसंघातील विद्यमान संघटनात्मक कामकाजाचा सखोल आणि सविस्तर आढावा घेण्यात आला.
SIR अभियानाची धडक अंमलबजावणी :- आगामी काळात SIR अभियान अधिक आक्रमक व प्रभावीपणे तळागाळात राबविण्याबाबत कडक निर्देश देण्यात आले.
बूथ आणि शक्ती केंद्र बळकटीकरण :-प्रत्येक बूथ स्तरावरील संघटन मजबूत करणे आणि शक्ती केंद्रांची कार्यक्षमता वाढवून विरोधकांना चीतपट करण्याची रणनीती आखण्यात आली.
समन्वय वाढवण्यावर भर :-  पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उच्चस्तरीय समन्वय साधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन करण्यात आले.



💥 कार्यकर्त्यांची फौज मैदानात 💥
संघटन हीच खरी भाजपाची ताकद असल्याचे दाखवून देत या बैठकीला विधानसभा मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, SIR समितीचे सदस्य, जिल्हा SIR समितीचे सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख तसेच विविध मोर्चांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी, प्रत्येक कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी आता एकजुटीने पुढे वाटचाल करा,” असा बुलंद नारा देत ही बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.