वरोरा :- सलोखा आणि उत्साहाच्या वातावरणात वरोरा येथे ईद निमित्त ‘शेरे हिंद कमिटी, वरोरा’ च्या वतीने भव्य दहीवडा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचा हजारो मुस्लिम बांधवांनी उत्साहात लाभ घेतला.
ईदच्या पवित्र पर्वावर सर्वसामान्यांमध्ये गोडवा आणि आनंदाचे वाटप करण्याच्या उद्देश हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान ‘शेरे हिंद कमिटी’च्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने उपस्थित बांधवांना दहीवड्याचे वाटप केले. या उपक्रमामुळे वरोरा शहरात सर्वत्र बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक उपक्रम या कमिटी तर्फे करण्यात येत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘शेरे हिंद कमिटी, वरोरा’च्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होते, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.




