Home जिल्हा हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा! वरोऱ्यात गुरुदेव सेवा मंडळ व शांतता समितीकडून जस्ने...

हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा! वरोऱ्यात गुरुदेव सेवा मंडळ व शांतता समितीकडून जस्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या रॅलीचे भव्य स्वागत.

oplus_0

वरोरा :- संपूर्ण विश्वाला शांती, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त (जस्ने ईद-ए-मिलादुन्नबी) वरोरा शहरात हिंदू-मुश्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. वरोरा तालुका गुरुदेव सेवा मंडळ व शांतता समितीच्या वतीने रॅलीत सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाबाच्या फुलांनी स्वागत करण्यात आले. तसेच डोंगरवार चौक येथे रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि उपस्थित मौलाना, मान्यवर व्यक्ती व अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.



💥 ऐक्याची तेजोमय परंपरा अविरत सुरू 💥
धर्म आणि जातीच्या पलीकडे जात मानवतेचा संदेश देणारे हे स्तुत्य कार्य वरोरा शहरात मागील अनेक वर्षांपासून गुरुदेव सेवा मंडळ व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. हा उपक्रम म्हणजे वरोरा शहराच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे आणि सलोख्याचे जिवंत प्रतीक ठरत आहे.



💥 रॅलीचा प्रेरणादायी मार्ग आणि सहभाग 💥
मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त वरोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील दर्गापासून सकाळी ९ वाजता भव्य रॅलीची उत्साहात सुरुवात झाली. संपूर्ण शहराला फेरी मारत जेव्हा ही रॅली डोंगरवार चौक येथे पोहोचली, तेव्हा रॅलीत सहभागी सर्वांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण आणि सलोख्याच्या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणरावजी गमे, शांतता समितीचे शेख जैरुद्दीन छोटूभाई, दशरथ शेंडे, अभिषेक भागडे , रूपलालजी कावडे, अशोकजी ठेंगे, श्री. पुरुषोत्तम भोयर सर, मोहसीन पठाण, नथुजी सोनटक्के, पुंडलिक कौरासे, श्री. मोदी, श्री. गाडगे महाराज, मारुती भेदुरकर यांच्यासह इतरही अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाने संपूर्ण वरोरा तालुक्यात ऐक्य व सलोख्याचा संदेश बुलंद केला आहे.