Home जिल्हा चंद्रपूर जिल्हा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: वरोरा पोलीस स्टेशनअंतर्गत ‘हरित रक्षक’ उपक्रमाचा दिमाखात...

चंद्रपूर जिल्हा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: वरोरा पोलीस स्टेशनअंतर्गत ‘हरित रक्षक’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ!

वरोरा :-पर्यावरण संवर्धनाला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत, चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत ‘हरित रक्षक’ या नवीन अभिनव उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार, दि. २५/०८/२०२६ रोजी संपन्न झाला. या उपक्रमाला GMR Warora Energy Limited आणि  Rotaract Club of Warora विशेष सहकार्य लाभले आहे. दोन्ही ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते

 



🙏 मान्यवरांची विशेष उपस्थिती 🙏
या महत्त्वाच्या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  मा. श्री. आयुष नोपाणी (I.P.S.) हे उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी सोहळ्यास वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी  मा. श्री. संतोष बाकल तसेच वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. ओमप्रकाश सोनटक्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच वरोरा पोलीस स्टेशनचा संपूर्ण पोलीस वृंद या कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी झाला होता.
या उपक्रमामुळे परिसरातील वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.