Home Breaking News वरोरा पोलिसांची सतर्कता; गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न!

वरोरा पोलिसांची सतर्कता; गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न!

वरोरा :- वरोरा पोलिसांची सतर्कता गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न.
आगामी गणेशोत्सव व विसर्जन नियोजन तसेच ईदच्या अनुषंगाने शांतता व सुरक्षेबाबत चर्चा. प्रमुख अधिकारी, पोलीस प्रशासन आणि आदरणीय लोकप्रतिनिधींची
डीजेचा वापर, गणेश विसर्जन आणि सलोखा कायम राखण्यावर भर.आगामी गणेशोत्सव आणि ईदच्या सणांच्या पार्श्वभूमीवर वरोरा येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सण उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी ‘शांतता कमिटीची महत्त्वाची बैठक’ पार पडली. बैठकीत डीजेचा वापर, गणपती विसर्जन मिरवणूक आणि सणांमधील परस्पर सलोखा या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.



🙏 मान्यवरांची प्रमुख उपस्थिती 🙏
या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, पोलीस दल आणि शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने खालील मान्यवरांची उपस्थिती होती:
श्री. आयुष नोपानी सर (SP),श्री. संतोष बाखाल (SDPO)  ओमप्रकाश सोनटक्के (पोलीस निरीक्षक, वरोरा)  संदीप भस्के (उपविभागीय अधिकारी)
प्रतिभाताई धानोरकर (माननीय खासदार, चंद्रपूर लोकसभा) करणदादा देवतळे (माननीय आमदार, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र) सौ. अर्चना ठाकरे (नगराध्यक्ष, न.प. वरोरा),सौ. योगिता नेरकर (उपनगराध्यक्ष) श्री. अयक्ष लोहे (PWD) व श्री. सिद्धार्थ मेश्राम (न.प. वरोरा) तसेच या बैठकीस परिसरातील पत्रकार बांधव, शांतता कमिटीचे सर्व सदस्य, संपूर्ण गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



💥 बैठकीतील मुख्य मुद्दे व मार्गदर्शन 💥
आक्रमक व शिस्तबद्ध भूमिका :- शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासनाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
गणेश विसर्जन नियोजन :-विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत आणि वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.
डीजेबाबत मार्गदर्शक सूचना :- न्यायालयाचे नियम आणि प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच वाद्ये व डीजेचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.
एकता व सलोखा :- आगामी सर्व सण एकमेकांच्या आदरभावात आणि जातीय सलोख्याने साजरे करून वरोऱ्याची शांतता व ऐक्य कायम राखण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.
प्रशासनाच्या आवाहनाला संपूर्ण गणेश मंडळे आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सण शांततेत पाळण्याचे आश्वासन दिले आहे.