Home विदर्भ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि आ....

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि आ. प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्यात आदिवासी विकास व शिक्षणावर महत्त्वाची चर्चा.

नांदेड :-अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नांदेड दौऱ्यादरम्यान समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर गणपत चासकर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. मा. आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम आणि समितीच्या सन्माननीय सदस्यांनी या उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध ज्वलंत विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.



आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला गती देणे तसेच कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या प्रमुख मुद्द्यांवर यावेळी विशेष मंथन झाले. विद्यापीठ स्तरावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हाती घ्यावयाच्या उपक्रमांवर आणि येणार्या अडीअडचणींवर मनमोकळी चर्चा होऊन अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकवा्यता दर्शवण्यात आली.या सकारात्मक भेटीमुळे नांदेड परिसरातील आदिवासी समाजघटकांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि विकासाला नवे बळ मिळेल, असा आशावाद बैठकीत व्यक्त करण्यात आला.