Home जिल्हा भद्रावती येथे नागपंचमीनिमित्त आयोजित ‘साबुदाणा खिचडी’ वितरण कार्यक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो...

भद्रावती येथे नागपंचमीनिमित्त आयोजित ‘साबुदाणा खिचडी’ वितरण कार्यक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो भाविकांनी घेतला लाभ

भद्रावती :-  नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त भारतीय जनता पार्टी, भद्रावती शहर व तालुकातर्फे आयोजित ‘साबुदाणा खिचडी’ वितरण कार्यक्रमाला भद्रावतीकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. गांधी चौकात पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे उपक्रमाला मिळालेला हा भक्कम प्रतिसाद आयोजकांच्या कार्याची पोचपावती देणारा ठरला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या साबुदाणा खिचडी वितरणासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग लागली होती. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. हंसराज भैय्या अहिर आणि वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप सुरू होताच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.



नागपंचमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या या जनसेवेच्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या वेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खिचडी वितरणाची व्यवस्था सांभाळली. भद्रावती शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक यशस्वी झाला.