वरोरा :- देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वरोरा येथील सद्भावना चौक येथे ‘एक शाम शहीदों के नाम’ या भव्य देशभक्तीपर गीत-संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सद्भावना एकता मंच व मित्रपरिवार’ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर शहीदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सविस्तर माहिती :- दिनांक :-१५ ऑगस्ट २०२६, शनिवार, वेळ :- सायंकाळी ७:००वाजल्यापासून
स्थळ :- सद्भावना चौक, वरोरा
👉 कार्यक्रमाचे आकर्षण.
“शहीदों की चितांवर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा!!” या ओळींना अनुसरून आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. देशप्रेमाच्या सुरांमध्ये सूर मिसळून शहीदांना शत-शत नमन करण्यासाठी वरोरा परिसरातील नागरिक, माता-भगिनी व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ‘सद्भावना एकता मंच व मित्रपरिवार’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.




