वरोरा :- देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी वरोरा शहरात उद्या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक रॅलीमध्ये वरोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार करणदादा देवतळे यांनी केले आहे.
रॅलीची सुरुवात आज दुपारी २ वाजता शहीद योगेश डाहूले स्मारक येथून होणार आहे. रॅलीचा मार्ग शहीद योगेश डाहूले स्मारक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पद्मावार चौक – नेहरू चौक – मित्र चौक – डोंगरवार चौक – वीर सावरकर चौक – महात्मा ज्योतिबा फुले चौक असा राहणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे.
या ऐतिहासिक आणि भव्य तिरंगा रॅलीमध्ये वरोरा शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध सामाजिक,माजी सैनिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक व पर्यावरणीय संघटना, व्यापारी बांधव, महिला भगिनी, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने व पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. करणदादा देवतळे यांनी केले आहे.
तिरंगा हा देशाच्या स्वाभिमान, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. त्यामुळे वरोरावासीयांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्तीची भावना अधिक बळकट करावी आणि ही तिरंगा रॅली ऐतिहासिक व भव्यदिव्य करावी, असे आवाहन आ.करनदादा देवतळे यांनी केले आहे.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳




