शेगाव :- शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा वडगाव शेत शिवारामध्ये एका विवाहित महिलेने लिंबाच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दुपारच्या सुमारास शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साखरा वडगाव शेत परिसरात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची तत्परता आणि ओळख पटवण्यात यश घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या ठिकाणी पाठवण्यात आला. दरम्यान, मृत महिला हीची ओळख पटत नसल्याने शेगाव पोलीस यांनी वेगाने चक्र फिरवत गिरड पोलीस यांच्याेश संपर्क करून मृतक महिलेची ओळख पटवली.
गळफास घेतलेल्या महिलेचे नाव मयुरी हरिदास सुपारे असून तिचे वय २७ वर्ष असून ती जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील खेक येथील असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. कांबळे व शेगाव पोलीस करीत आहेत.




