चंद्रपूर, २८ जुलै :- सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि प्रभावी निवारण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने आज मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात “तक्रार निवारण दिन” पाळण्यात येत आहे. यादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत आणि त्यावर कायदेशीर उपाययोजना करणार आहेत.
कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये :- दिनांक :-२८ जुलै २०२६ (मंगळवार) वेळ : – सकाळी ११:०० ते दुपारी १४:०० वाजेपर्यंत स्थळ :- जिल्ह्यातील संबंधित सर्व प्रमुख पोलीस ठाणे परिसर
पोलिस ठाणेनिहाय उपस्थित राहणारे वरिष्ठ अधिकारी
👉 पोलिस ठाणे उपस्थित वरिष्ठ अधिकारी
१ ) पोलिस ठाणे रामनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर
२ ) पोलिस ठाणे वरोरा, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा
३ ) पोलिस ठाणे ब्रह्मपुरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी
४) पोलिस ठाणे मुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल
५ ) पोलिस ठाणे बल्लारशाह, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा
६ ) पोलिस ठाणे गडचांदूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर
७ ) पोलिस ठाणे भिसी,उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर
८ ) जिल्ह्यातील इतर सर्व ठाणे, संबंधित पो.स्टे. प्रभारी अधिकारी
🙏 नागरिकांना नम्र आवाहन 🙏
चंद्रपूर पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी निर्धारित वेळेत आपल्या संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या तक्रारींचे योग्य निरसन करून घ्यावे.




