Home Breaking News पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची...

पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न.

वरोरा :-आज दिनांक १८ जुलै २०२६ रोजी पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती व्हावी या उद्देशाने लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. सदर कार्यक्रम शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मा. नगावी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
निवडणूक प्रक्रियेत शिक्षण विभागाचे प्रमुख मा. बायसकर सर व आनंदवन महाविद्यालयाचे श्री. ताजणे सर यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय उत्साहाने मतदानात सहभाग घेतला. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन सौ. डवस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या उपक्रमात सौ. बंटूकवार मॅडम, श्री. खैरागाडे सर, अमोल आकारी सर, आदित्य दवे (योग शिक्षक) आणि जाणवे मॅडमढवस मॅडम, खोब्रागडे सर, अमोल आवारी सर यांनी विशेष सहकार्य केले.

मतदान प्रक्रियेनंतर काही वेळातच निकाल घोषित करून नवीन शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळ खालीलप्रमाणे आहे:
👉 मुख्यमंत्री :- नंदिनी चंद्रोल
👉 उपमुख्यमंत्री :- गौरव बनसोड
👉 शिक्षणमंत्री :- अनुश्री आमने
👉 स्वच्छतामंत्री :- जय बावण
👉 आरोग्यमंत्री :-मोहिनी नन्नावरे
👉 न्यायमंत्री :- वेदिका वाकळे
👉 पर्यावरणमंत्री :- खुशबू दुध
👉 सांस्कृतिकमंत्री :- ईश्वरी बायले
👉 परिपाठमंत्री :-आर्या शिखे
👉 क्रीडा मंत्री :-शिवडोणे, अदिती नन्नावरे
निवडणुकीनंतर मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. योग शिक्षक आदित्य दवे यांनी सर्व मंत्रिमंडळाला शाळेच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याची शपथ दिली. अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.