मुंबई :- “धक्कादायक प्रकार उघडकीस: जनआरोग्य धोक्यात”
लग्नसराईच्या धामधुमीत पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी वापरले जाणारे थंड पाणी आता थेट आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. काही वेंडरकडून पाण्याचे जार आणि बंद बाटल्या कमी वेळात आणि कमी खर्चात ‘सुपर कुल’ करण्यासाठी ‘इथिलिन ग्लायकॉल’ (Ethylene Glycol) या अत्यंत घातक रसायनाचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत आता संबंधित प्रशासनावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
💥 काय आहे हे घातक रसायन 💥
इथिलिन ग्लायकॉल हे प्रामुख्याने ऑटोमोबाईल इंजिनमध्ये ‘कूलंट’ म्हणून वापरले जाणारे एक विषारी रसायन आहे. हे रसायन पाण्याचे तापमान वेगाने कमी करते, पण त्याचे शरीरातील अंश मूत्रपिंड (Kidneys), यकृत आणि मज्जासंस्थेवर कायमस्वरूपी घातक परिणाम करू शकतात. हे रसायन थेट पोटात गेल्याने अवयव निकामी होण्याचा किंवा मृत्यूचा धोकाही संभवतो.
💥 मुंडे साहेबांचा आक्रमक पवित्रा 💥
सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ मुंडे साहेबांनी अत्यंत गंभीरपणे घेतला आहे. “लग्नाच्या आनंदी वातावरणात पाहुण्यांना मृत्यूचे पाणी पाजणाऱ्या या रॅकेटला पाठिशी घातले जाणार नाही,” अशी गर्जना करत त्यांनी या प्रकाराची तातडीने सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
💥जनतेची सुरक्षा प्रथम 💥प्रत्येक मंगल कार्यालयात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची कठोर तपासणी झालीच पाहिजे.
💥 दोषींवर कारवाई 💥केवळ दंड नको, तर लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या वेंडरवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल झाला पाहिजे.
💥 प्रशासनाला इशारा 💥अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याप्रकरणी तातडीने मोहीम राबवून पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे धाबे दणाणून सोडावेत.
💥 नागरिकांना आवाहन 💥
लग्नाचे आयोजक आणि वऱ्हाडी मंडळींनी पाणी घेताना सावधगिरी बाळगावी. बर्फाचा वापर करून बाटल्या थंड केल्या जात असतील, तर त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
मुंडे साहेबांच्या या भूमिकेमुळे आता अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर कारवाईचा मोठा दबाव निर्माण झाला आहे. आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता कारागृहाची हवा खावी लागणार, हे निश्चित!




