वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आणि लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला. केवळ शक्तिप्रदर्शन न करता, सामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आपल्या लाडक्या आमदारांच्या कार्याचा वारसा पुढे नेत, मित्र परिवाराने रुग्णालय आणि शाळांमध्ये मदतकार्य करून मानवतेचा संदेश दिला आहे.
रुग्णसेवेला प्राधान्य :- उप जिल्हा रुग्णालयात बेबी किट्सचे वाटप.
आमदारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उप जिल्हा रुग्णालयात नवजात बालके आणि त्यांच्या मातांसाठी ‘बेबी किट्स’ तसेच रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत, त्यांना धीर देण्याचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने आमदार करणदादांच्या जनसेवेच्या भूमिकेला साजेसा ठरला.
शाळेत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित
याच साखळीत महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, बावणे लेआऊट, वरोरा येथेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आमदार करणदादा देवतळे मित्र परिवारा’च्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेत शाळेतील चिमुकल्यांना फळे वाटली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
‘जनतेचा नेता’ म्हणून वाढती लोकप्रियता.
विकासकामांच्या जोरावर अल्पावधीतच वरोरा-भद्रावतीच्या जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण करणारे आमदार करणदादा देवतळे यांनी नेहमीच ‘जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य जपले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमांमुळे, केवळ राजकारण नव्हे तर समाजकारण करणारा एक संवेदनशील नेता म्हणून त्यांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
यावेळी मित्र परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त वरोरा-भद्रावतीतील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी आमदार करणदादांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.




