Home राजकारण बोरी-पाटणबोरी आणि लोणबेहळच्या आरोग्य सुविधांसाठी विधानसभेत तोडसामांचा ‘बुलंद’ आवाज!

बोरी-पाटणबोरी आणि लोणबेहळच्या आरोग्य सुविधांसाठी विधानसभेत तोडसामांचा ‘बुलंद’ आवाज!

मुंबई :-रुग्णांच्या हक्कांसाठी राजूभाऊ तोडसाम मैदानात; आरोग्यमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन.ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या दुर्दशेवर कठोर प्रहार करत, बोरी-पाटणबोरी आणि लोणबेहळ येथील जनतेला हक्काची व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी महाराष्ट्र विधानसभेत जोरदार आवाज उठवला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आरोग्य विभागाने अखेर सकारात्मक हालचाली सुरू केल्या असून, रुग्णांना दिलासा मिळणार आहे.




💠 काय आहेत मुख्य मागण्या 💠
आमदार तोडसाम यांनी सभागृहात मांडलेल्या मागण्यांमुळे दुर्गम भागातील आरोग्य प्रश्नांना वाचा फुटली आहे:




💠५० खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा💠 बोरी-पाटणबोरी येथे अद्यावत रुग्णालय उभारूनही केवळ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्ण वाऱ्यावर आहेत. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करून तेथील डॉक्टरांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी त्यांनी लावून धरली.




💠लोणबेहळला १०८ रुग्णवाहिकेचा आधार💠 आपत्कालीन स्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी लोणबेहळ प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देण्याचा आग्रह त्यांनी धरला.




💠 दुर्गम भागात आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण💠 ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणी केली.




💠 आरोग्यमंत्र्यांकडून ‘प्राधान्य’ देण्याचे आश्वासन 💠
आमदार तोडसाम यांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत आरोग्यमंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर यांनी सभागृहात ठोस आश्वासन दिले. नुकत्याच पार पडलेल्या १४०० डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेतून बोरी-पाटणबोरी येथील रुग्णालयाला प्राधान्याने डॉक्टर देण्याचे आणि लोणबेहळच्या रुग्णवाहिकेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
“जनतेच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. बोरी-पाटणबोरी आणि लोणबेहळच्या रुग्णांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सभागृहात लढा दिला आहे आणि या सुविधा प्रत्यक्ष जमिनीवर मिळेपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील.”
🙏 आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम 🙏
👉 जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज… विकास आणि जनसेवेसाठी सातत्यपूर्ण संघर्ष! 🚩