वरोरा :- राजकीय वर्तुळात मोठी खळबळ; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत होणार शक्तिप्रदर्शन
सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी, भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा संजय देवतळे यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आगामी ४ जुलै रोजी वरोरा येथे आमदार करणदादा देवतळे यांच्या भव्य जनसंपर्क कार्यालयाचा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, या कार्यक्रमाने संपूर्ण भद्रावती व वरोरा तालुक्यात भाजपची एकजूट दिसून येणार आहे.
💠 दिग्गज नेत्यांची उपस्थिती, विरोधकांचे टेन्शन वाढणार! 💠
या उद्घाटन सोहळ्याला राजकारणातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मा. ना. डॉ. अशोकजी उईके यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. हरिशजी शर्मा भूषवणार आहेत.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. हंसराजजी अहिर उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे दिग्गज नेते मा. श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासह मा. श्री. कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया, मा. श्री. किशोरजी जोरगेवार, मा. श्री. देवरावजी भोंगळे आणि मा. श्री. अरुणजी लखानी हे आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती पाहता, हे केवळ कार्यालय उद्घाटन नसून वरोऱ्यातील भाजपचे एक मोठे ‘शक्तिप्रदर्शन’ मानले जात आहे.
💠 सर्वसामान्यांच्या हितासाठी सज्ज 💠
‘सहकार महर्षी दादासाहेब देवतळे जिनिंग प्रेसिंग सोसायटी, एलआयसी ऑफिसच्या मागे, वरोरा’ येथे हे कार्यालय असून, या ठिकाणाहून जनतेची कामे अधिक गतीने आणि प्रभावीपणे मार्गी लावली जाणार आहेत. “जनतेचा सेवक” ही आपली ओळख अधिक गडद करण्यासाठी आमदार करण देवतळे सज्ज झाले असून, या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन वरोरा शहर, टेंमुर्डा-शेगाव, माढेली-खांबाडा, घोडपेठ-माजरी आणि नंदोरी-चंदनखेडा येथील मंडल अध्यक्ष व सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता होणाऱ्या या सोहळ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




