Home जिल्हा आनंदवनात चिमुकल्यांचे जंगी स्वागत: बैलगाडीतून निघाली पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाही मिरवणूक.

आनंदवनात चिमुकल्यांचे जंगी स्वागत: बैलगाडीतून निघाली पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाही मिरवणूक.

वरोरा :-पी.एम. श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे नुकताच पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात आणि पारंपारिक थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी चक्क सजवलेल्या बैलगाडीचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये बसलेल्या चिमुकल्यांची ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक सर्वांचेच आकर्षण ठरली.




💠डॉ. विकास आमटे यांच्या उपस्थितीत जल्लोष💠
शाळेपासून निघालेली ही मिरवणूक आनंदवनातील प्रमुख मार्गांवरून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकासभाऊ आमटे यांच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकासभाऊ आमटे यांनी नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत करत त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.




💠 शिक्षकांचे नियोजन आणि परिश्रम 💠
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नगाजी साळवे यांनी केले. यावेळी त्यांनी शाळा प्रवेशोत्सवाचे महत्त्व विषद केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल आवारी, ढवस मॅडम, आत्राम, गायकवाड, नलगिंटवार मॅडम, खोब्रागडे, आदित्य डावे आणि जानवे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिक्षक विजय बांदुरकर यांनी मानले.
परंपरा आणि आधुनिक शिक्षणाची सांगड घालणारा हा अनोखा प्रवेशोत्सव पालक आणि ग्रामस्थांच्या स्मरणात राहील असाच ठरला.