Home जिल्हा 15वर्षांची प्रतीक्षा संपली; गड्डमवार लेआऊटमध्ये अखेर स्ट्रीट लाईटचा उजेड

15वर्षांची प्रतीक्षा संपली; गड्डमवार लेआऊटमध्ये अखेर स्ट्रीट लाईटचा उजेड

भद्रावती : शहरातील प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत गड्डमवार लेआऊट परिसरातील नागरिकांची तब्बल 15 वर्षांपासूनची स्ट्रीट लाईटची समस्या अखेर मार्गी लागली* आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात एकही स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची अंधारामुळे गैरसोयींसह सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता.




*या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक महेश जिवतोडे* यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या विशेष प्रयत्नांना *नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी* यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने गड्डमवार लेआऊटमध्ये स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.




स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी *नगरसेवक महेश जिवतोडे व नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी* यांचे आभार व्यक्त केले आहेत. परिसराच्या विकासासाठी अशाच प्रकारे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.