Home जिल्हा वरोरा कन्येची गरुडझेप! MHT-CET परीक्षेत सुरभी जाजू हिने मिळवले ९९.९९ पर्सेंटाईल; आमदार...

वरोरा कन्येची गरुडझेप! MHT-CET परीक्षेत सुरभी जाजू हिने मिळवले ९९.९९ पर्सेंटाईल; आमदार करणदादा देवतळे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

वरोरा :-वरोरा येथील सुप्रसिद्ध  डॉ.जाजू यांची नात  कु. सुरभी विशाल जाजू हिने MHT-CET (PCM) २०२६ परीक्षेत तब्बल ९९.९९ पर्सेंटाईल गुण मिळवत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या घवघवीत यशाची दखल घेत वरोरा-भद्रावतीचे लोकप्रिय आमदार करण दादा देवतळे यांनी आज तिचे निवासस्थान गाठून तिचे विशेष अभिनंदन केले.

​सुरभीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल आमदार देवतळे यांनी तिचे आणि तिच्या पालकांचे  कौतुक केले. “सुरभीने अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने हे यश संपादन केले असून, तिची ही प्रगती वरोऱ्यातील इतर तरुण-तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तिचे मार्गदर्शन करणारे कुटुंबियही उपस्थित होते, ज्यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगत आ. करनदादा देवतळे यांनी त्यांचेही अभिनंदन केले. त्यावेळी वरोरा शहराचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष  पवार, अमित भाऊ चैवले उपस्थित होते.