Home जिल्हा दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीस अभिवादन: विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना मिळणार व्यासपीठ;...

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीस अभिवादन: विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना मिळणार व्यासपीठ; भव्य ‘लेखी परीक्षे’चे आयोजन.

वरोरा :- लोकनेते, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वरोरा येथे एका भव्य ‘लेखी परीक्षेचे’ आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक कौशल्ये व बुद्धिमत्तेला वाव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे.


🔳 गुणवत्तेला प्रोत्साहन, बक्षिसांची मोठी घोषणा 🔳
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक उत्साह वाढवण्यासाठी अत्यंत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:
💠  प्रथम पारितोषिक  :- २१,००० रुपये रोख.
💠  द्वितीय पारितोषिक :- ११,००० रुपये रोख.
💠  तृतीय पारितोषिक :- ५,००० रुपये रोख.
👉  नोंदणीसाठी वेळेचे भान राखा.



ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता ‘लोकमान्य महाविद्यालय, वरोरा’ येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी घाई करणे आवश्यक आहे, कारण नोंदणीची अंतिम तारीख २६ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.




👉  सहभागासाठी संपर्क
या संधीचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ☎️ ८३२९६४७४२७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या विचारांचा वारसा जपत, तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात प्रोत्साहन देणारा हा उपक्रम वरोरा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.