वरोरा :- ‘योग हा केवळ व्यायाम नसून ती एक जीवनपद्धती आहे’, हा संदेश देत जागतिक योग दिनानिमित्त वरोरा येथील गांधी उद्यान योग मंडळातर्फे अत्यंत उत्साहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्यासह शहरातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली.
💠 योगमय झाले वरोरा 💠
आज सकाळी गांधी उद्यान परिसरात पहाटेपासूनच नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. ‘योगासने करा, निरोगी राहा’ असा एकमुखी संदेश यावेळी देण्यात आला.
💠 मान्यवरांची विशेष उपस्थिती 💠
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आमदार करणदादा देवतळे, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, तसेच प्रवीण सुराणा, नरेंद्र नेमाडे, आनंद गुंडावार, प्रमोद गिलोरकर, सचिन जीवतोडे, विशाल जाजू, पवन मालू, सुनील शेंडे, विजय भोले, मनोज कोहळे, संजू पामपट्टीवार, अजय नरडे, ज्ञानचंद मालू, प्रकाश संचेती, अक्षय सोनटक्के, जयंत मारोडकर, स्वप्निल देवाळकर, सुनील नरडे, अविधा मडावी सर, विनोद जानवे, अनिल भडघरे, शंभुनाथ वर्गने, राजू हरियाणी, संदीप शेठीया आणि पराग पत्तीवार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
💠 मान्यवरांनी व्यक्त केले विचार 💠
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून योगाचे महत्त्व पटवून दिले. आमदार करणदादा देवतळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “धावपळीच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याप्रती जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे.”
गांधी उद्यान योग मंडळाच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, सुदृढ वरोरा घडवण्यासाठी अशा कार्यक्रमांची साखळी अशीच सुरू राहावी, अशी भावना व्यक्त केली जात आहे.




