घुग्घुस :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत, घुग्घुस भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक विवेक बोढे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आईच्या सन्मानार्थ निसर्गाची जोपासना
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगरसेवक विवेक बोढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून, आईच्या प्रति सन्मान व्यक्त करण्याचा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. नागरिक आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून निसर्गाला हिरवेगार ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देऊ शकतात.”
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक
वाढते प्रदूषण आणि वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर चिंता व्यक्त करत, विवेक बोढे यांनी वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनाची काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. “घुग्घुस शहर हिरवेगार करण्याचे आमचे स्वप्न असून, या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी गटनेत्या मिना मोरपाका, स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेवक गणेश पिंपळकर, युवानेते अमोल थेरे, बबलू सातपुते, गणेश कुटेमाटे, राजेश मोरपाका, असगर खान, कोमल ठाकरे, उमेश दडमल, हेमंत कुमार, सचिन नांदे, प्रणय काटवले, अजय लेंडे, रज्जाक शेख यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Breaking News घुग्घुसमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; वृक्षसंवर्धन काळाची गरज :...




