चंद्रपूर :-शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी कंबर कसली असून, याच मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बाबू पेठ परिसरात धडक कारवाई केली आहे. एका घरात सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून १० संशयित आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना बाबू पेठ येथील आंबेडकर चौकात एका घरात काही लोक पैशांची बाजी लावून ‘तीन पत्ती’ जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तात्काळ सापळा रचला आणि संबंधित घरावर अचानक धाड टाकली.
५२ पत्त्यांसह १० जण जेरबंद
पोलिसांनी धाड टाकली असता, घराच्या पहिल्या खोलीत काही लोक मोठ्या उत्साहात जुगार खेळण्यात दंग होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ पत्त्यांसह जुगारासाठी वापरलेले रोख पैसे जप्त केले आणि खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले.
अटकेत असलेले आरोपी
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) गुणवंत सोमाजी आवळे (३५)
२) रॉयल शैलेंद्र पाटील (२७)
३) सचिन प्रल्हाद गोवर्धन (३५)
४) अतुल धनराज ढोक (३६)
५) शामराव प्रल्हाद पिंपरे (५२)
६) सचिन मिलींद मानकर (४०)
७) प्रफुल जानबा भागवत (३५)
८) सुधीर हिरालाल जांभुलकर (३४)
९) ब्रम्हदेव मोहन गोरी (५४)
१०) अविनाश संजय वासेकर (३०)
सर्व १० आरोपींवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कुणाच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.




