Home Breaking News suicide attempt : घरगुती भांडणातून आत्महत्येचा प्रयत्न

suicide attempt : घरगुती भांडणातून आत्महत्येचा प्रयत्न

भंडारा, २२ मे  : घरगुती वादातून एका महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घडली. रोशनी शत्रुघ्न मोहनकर असे या महिलेचे नाव आहे. तिला स्थानिकांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.

यासंदर्भातील माहितीनुरास लाखनी येथे राहणारे शत्रुघ्न मोहनकर व पत्नी रोशनी हे भाजीपाल्याचा व्यवसाय करीत आहेत.पती-पत्नीत झालेल्या भांडणात पत्नीने रागाच्या भरात घराबाहेर पडून कारधा वैनगंगा नदी गाठली. तिने कारधा लहान पुलावरुन वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला.(Attempted suicide)मात्र नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांना महिला नदीपात्रात उडी घेतल्याचे दिसून येताच प्रवीण खंगार यांनी जीवाची पर्वा न करता वैनगंगेत उडी घेऊन महिलेला वाचविले.