Home Breaking News accident : गोंदियात पोलीस गाडी आणि माल वाहू ट्रकच्या अपघातात

accident : गोंदियात पोलीस गाडी आणि माल वाहू ट्रकच्या अपघातात

गोंदिया, २२ मे, : गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली.

एका तरुणाचा मृत्यू झाला असून मृतकामध्ये साहिल कुडमेते याचा समावेश आहे. मृतक हा गोंदिया शहरातील एका कंपनीत जॉब करत असून चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी आहे. तर जखमी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत. तर इतर तीन तरुण किरकोळ जखमी असून जखमीवर गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयात उपचार सुरु आहे.