Home Breaking News वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर...

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर !

वर्धा/चंद्रपूर/गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी श्री. अरुण लखानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, या महत्त्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी श्री. अरुण लखानी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, यामुळे या क्षेत्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाने या महत्त्वाच्या जागेवर लखानी यांना संधी देऊन विजयाचा संकल्प केला आहे. त्यांच्या उमेदवारीने आगामी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार हे स्पष्ट झाले असून, आता सर्वांचे लक्ष या मतदारसंघातील प्रचाराकडे लागले आहे.