Home Breaking News महत्त्वाची सूचना: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी ‘हयात प्रमाणपत्र’ ऑनलाईनच सादर करावे!

महत्त्वाची सूचना: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी ‘हयात प्रमाणपत्र’ ऑनलाईनच सादर करावे!

वरोरा:-संजय गांधी निराधार योजना आणि केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालय, वरोरा यांच्यावतीने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
आता लाभार्थ्यांना आपले ‘हयात प्रमाणपत्र’ (Digital Life Certificate) सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाने तहसील कार्यालयातील प्रत्यक्ष हयात प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.
काय करावे ?
सर्व लाभार्थ्यांनी जवळच्या C.S.C, महाऑनलाईन केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रावर जाऊन आपले ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेट’ ऑनलाईन करून घ्यावे.
ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्या प्रमाणपत्राची प्रत किंवा कागदपत्रे तहसील कार्यालयात आणून देण्याची कोणतीही गरज नाही.
ऑनलाईन सिस्टिमवर एकदा हयात असल्याची नोंद झाली की, ती आपोआप अपडेट होते, त्यामुळे पुन्हा तहसीलमध्ये वेगळी नोंद करण्याची आवश्यकता नाही.
तरी सर्व लाभार्थ्यांनी या सूचनेची नोंद घ्यावी आणि विनाकारण तहसील कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन तहसील कार्यालय, वरोरा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.