Home Breaking News वरोरा-भद्रावतीच्या समस्यांवर चर्चा; युवा नेते मुकेशभाऊ जीवतोडे यांनी घेतली बच्चूभाऊ कडू यांची...

वरोरा-भद्रावतीच्या समस्यांवर चर्चा; युवा नेते मुकेशभाऊ जीवतोडे यांनी घेतली बच्चूभाऊ कडू यांची नागपुरात सदिच्छा भेट

नागपूर :-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे आणि शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) युवा तडफदार नेते मुकेशभाऊ जीवतोडे यांनी नागपूर येथे विदर्भ विभागीय नेते मा. बच्चूभाऊ कडू यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत आणि सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शेतकरी हिताच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मक संवाद झाला. परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर मुकेशभाऊ जीवतोडे यांनी आग्रही भूमिका मांडली.
नागरिकांच्या समस्या आणि विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या या पुढाकारामुळे वरोरा-भद्रावतीसह चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सुटण्यास निश्चितच गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या या सक्रियतेमुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏