Home Breaking News ⚠️ सावधान! पालकांनो, मुलांच्या आरोग्यासाठी ‘हे’ ५ दिवस अत्यंत धोकादायक; ‘नवतप’ काळाची...

⚠️ सावधान! पालकांनो, मुलांच्या आरोग्यासाठी ‘हे’ ५ दिवस अत्यंत धोकादायक; ‘नवतप’ काळाची कडक अंमलबजावणी करा!

वरोरा :- देशात ‘नवतप’ला सुरुवात; भीषण उष्णतेपासून बालकांचा बचाव करण्यासाठी पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना.सध्या देशात ‘नवतपा’चा कालावधी सुरू झाला आहे. पुढील काही दिवस कडक उन्हाच्या झळा आणि उष्णतेचा प्रचंड दाह अनुभवायला मिळणार आहे. या काळात पृथ्वीवर सूर्याची किरणे थेट पडत असल्याने जमिनीचे तापमान एखाद्या भट्टीतपल्याप्रमाणे वाढणार आहे. अशा परिस्थितीत, मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे पालकांसाठी अत्यंत अनिवार्य झाले आहे.
🛑 काय आहे ‘नवतप’?
जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्या नक्षत्राच्या शीतलतेमुळे सूर्याची उष्णता अधिक वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर अतिउष्णतेचा दाह निर्माण होतो. या नऊ दिवसांच्या काळाला ‘नवतप’ असे म्हणतात.
✅ मुलांची काळजी कशी घ्यावी? (पालकांसाठी मार्गदर्शक)
👉 बाहेर जाणे टाळा :- सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मुलांना घराबाहेर नेणे टाळा.
👉 हायड्रेशन ठेवा :-मुलांना पुरेसे पाणी पाजत राहा, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.
👉 आहार आणि पोषाख :-पचायला हलका आहार द्या आणि मुलांना सुती कपड्यांचा वापर करायला सांगा.
👉 वातावरण थंड ठेवा :- मुलांच्या खोलीत हवा खेळती राहिल याची काळजी घ्या आणि खोली थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
👉 आरोग्याची लक्षणे :-ताप, उलटी, सर्दी किंवा खोकला अशी लक्षणे दिसल्यास कोणताही उशीर न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🚫 ‘नवतप’ काळात ‘या’ गोष्टी टाळणेच हिताचे !
👉  चॉकलेट आणि सॉफ्ट ड्रिंक्स :-चॉकलेट आणि सॉफ्ट ड्रिंक्समुळे शरीरातील उष्णता वाढून डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
👉 पॅकेज्ड ज्यूस :-यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने यकृत आणि पोटासाठी ते घातक ठरू शकतात.
👉 अति थंड पाणी/आईस्क्रीम :-यामुळे घशाला सूज येऊन इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
पालकांनो, मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे कडक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मुलांची या कडक उन्हापासून सुरक्षा ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे!

🙏 जय विदर्भ🙏