चंद्रपूर/नवी दिल्ली :_भारतीय जनता पक्षाचे नेते आणि वरोरा विधानसभा ७५ चे निवडणूक प्रमुख मा. श्री. रमेशजी राजुरकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल अवॉर्ड कौन्सिल’तर्फे अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
🙏 असाधारण कार्याचा गौरव 🙏
श्री. रमेश राजुरकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत केलेले असाधारण कार्य आणि त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव म्हणून या संस्थेने त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे. त्यांच्या या अविस्मरणीय योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
🙏सन्मान सोहळा 🙏
आज दिनांक २४ मे, २०२६ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे त्यांना हा बहुमान मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि वरोरा परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मा. श्री. रमेशजी राजुरकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून, त्यांच्या भावी सामाजिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
🙏 जय विदर्भ 🙏




