Home Breaking News दिल्लीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ‘जयघोष’! जनजाती सांस्कृतिक समागमात आदिवासी बांधवांच्या रॅलीने वेधले लक्ष.

दिल्लीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ‘जयघोष’! जनजाती सांस्कृतिक समागमात आदिवासी बांधवांच्या रॅलीने वेधले लक्ष.

दिल्ली :-देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ‘जनजाती सांस्कृतिक समागम’ कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा भव्य आणि प्रभावी ठसा उमटला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील जनजाती बांधवांच्या सांस्कृतिक रॅलीचा शुभारंभ करण्याची संधी मला मिळाली, हा क्षण अत्यंत अभिमानास्पद ठरला.
🙏सांस्कृतिक वैभवाचे दर्शन 🙏
देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जनजाती बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि विशिष्ट सांस्कृतिक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेचे दर्शन घडवले. या रॅलीने केवळ एकताच नव्हे, तर आपल्या समृद्ध वारशाच्या जतनाची महत्त्वाची हाक दिली. लोककलांच्या तालावर आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या भव्य रॅलीने दिल्लीचे रस्ते अक्षरशः दुमदुमून गेले होते.
👉 दिग्गजांची उपस्थिती :-
या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. अशोकजी उईके , आमदार मा. श्री. राजू भाऊ तोडसाम, माजी खासदार मा. श्री. अशोकजी नेते , आमदार मा. डॉ. मिलिंदजी नरोटे आणि ज्येष्ठ नेते मा. श्री. एन. डी. गावित  यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली.
👉 एकतेचा संदेश :-
जनजाती संस्कृती ही भारताच्या अस्मितेचा मूळ आधार आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आपल्या परंपरा जपत, आधुनिकतेच्या प्रवाहात सामील होत देशाच्या विकासात जनजाती बांधवांचे योगदान किती मोलाचे आहे, याची प्रचिती या समागमातून आली. महाराष्ट्राच्या या भव्य रॅलीने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती.

🙏 जय विदर्भ 🙏