राजुरा :- भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६ अंतर्गत राजुरा येथील स्व. ॲड. दादाजी देशकर सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गाला अत्यंत उत्साहात आणि ऊर्जेने सुरुवात झाली आहे. काल, २३ मे २०२६ रोजी या वर्गाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातून आलेल्या उत्साही आणि कर्तव्यनिष्ठ पदाधिकाऱ्यांसह मी देखील आवर्जून उपस्थित राहीलो.
प्रशिक्षण हा आपल्या संघटनेचा आत्मा आहे. कार्यकर्त्याला वैचारिक दृष्ट्या सक्षम बनवणे, त्याला पक्षाचा इतिहास, कार्यपद्धती आणि ‘एकात्म मानव दर्शन व सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या पंचनिष्ठांची प्रचिती करून देणे हाच या महाअभियानाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दिवशी उद्घाटनीय सत्रात राज्याचे माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तर माजी राज्यसभा सदस्य माजी खासदार डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे, आमदार सौ. चित्राताई वाघ, आमदार प्रतापदादा अडसड, वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे, श्री. संजय फांजे आणि श्री. सागरजी फुंडकर यांसारख्या ज्येष्ठ व व्यासंगी मार्गदर्शकांनी विविध सत्रांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक ऊर्जा फुंकली.
व्यावहारिक सत्र, कार्यपद्धती, बूथ व्यवस्थापन, मन की बात, आयटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची सकारात्मक प्रतिमा कशी निर्माण करावी, यावर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन काल संपन्न झाले.
वैचारिक अधिष्ठानाची ही शिदोरी घेऊन आज, २४ मे रोजी देखील आपल्या सरकारांच्या गरीब कल्याण योजनांचा प्रचार-प्रसार करणे आणि देशासमोरील राजकीय व सामाजिक आव्हानांना तोंड देत कार्यविस्तार कसा करावा, याविषयीचे सखोल मंथन सुरू आहे.
हा प्रशिक्षण वर्ग म्हणजे केवळ एक उपक्रम नसून, येणाऱ्या काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि लोककल्याणकारी विचार तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना मिळालेली नवी दिशा आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




