चंद्रपूर :-“स्वप्न पाहणे सोपे असते, पण ते पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” याच जिद्दीला बळ देण्यासाठी आणि उद्याच्या महाराष्ट्राला घडवण्यासाठी ‘अम्मा की पढाई फाउंडेशन’ सज्ज झाले .
काल शनिवार, २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे ‘गुणगौरव व विद्यार्थी सोहळा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले . या सोहळ्यात १२ वी मध्ये ७५% पेक्षा जास्त, १० वी मध्ये ८०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या तसेच JEE मध्ये यश संपादन करणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
🙏कार्यक्रमाची खास वैशिष्ट्येक्ष🙏
केवळ सत्कारच नव्हे, तर विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य वाटा दाखवण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते
👉 प्रमुख मार्गदर्शक :- मा. श्री. यजुर्वेद महाजन (आंतरराष्ट्रीय वक्ते व ‘महाराष्ट्र ऑफ द इयर’ पुरस्कार विजेते).
विशेष उपस्थिती :-मा. श्रीमती वसुंधरा पंत (IAS, जिल्हाधिकारी, चंद्रपूर) आणि मा. श्री. आयुष नोपानी (IPS, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्ने उजळून पाहणार आहेत.
👉 आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली आयोजित हा सोहळा म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा एक उपक्रम ठरणार आहे. या चंद्रपूर विधानसभेचे असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी पने पार पडला अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष स्वागत करुया व त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
“आमदार किशोरभाऊ जोरगेवार यापुढेही असेच कार्यक्रम अम्मा की पढाई या संस्थेद्वारे चालू राहील.”
🙏 जय विदर्भ 🙏




