वरोरा :- शहरातील सुभाष वार्ड, साईनगर भागात पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक रहिवासी मनोहर गजानन लोडे यांच्या घरी सिलेंडर लीक झाल्यामुळे हा अपघात घडला. या स्फोटात घरातील व घर शेजारी पुरुष जखमी झाली असून, घराचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, याच भागात सिलेंडर स्फोटाची ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये गॅस एजन्सीच्या हलगर्जीपणाविरोधात प्रचंड संताप उसळला आहे. “पहिल्या स्फोटानंतरच प्रशासनाने संबंधित गॅस एजन्सीवर कडक कारवाई केली असती, तर आज ही दुर्दैवी वेळ आली नसती,” असा संतप्त सवाल आता वरोरावासीय विचारत आहेत.
👇👇👇घटना खालील प्रमाणे आहे 👇👇👇
सुभाष वार्ड, साईनगर येथील मनोहर गजानन लोडे यांच्या घरी गॅस सिलेंडर जोडत असताना किंवा वापरत असताना अचानक गॅस गळती (लीकेज) सुरू झाली. गॅस हवेत पसरल्याने काही वेळातच सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाला. हा स्फोट की त्याचा आवाज संपूर्ण परिसरात ऐकू आला. स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील पुरुष व शेजारी एक व्यक्ती जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच लोडे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जीवाची खेळ!
साईनगर भागात सिलेंडर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. वारंवार लीक होणारे सिलेंडर पुरवणे, ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासणे हा संबंधित गॅस एजन्सीचा जणू नित्याचाच कारभार झाला आहे. पहिल्या घटनेच्या वेळी जर पुरवठा विभाग आणि प्रशासनाने या एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई केली असती, तर आज मनोहर लोडे यांच्या कुटुंबावर हा प्रसंग ओढवला नसता, असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
‘ती’ गॅस एजन्सी तात्काळ रद्द करा; वरोरा जनतेची आक्रमक मागणी!
या घटनेनंतर संपूर्ण वरोरा शहरात गॅस एजन्सीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. जनतेच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या संबंधित गॅस एजन्सीचा परवाना (लायसन्स) प्रशासनाने तात्काळ रद्द करावा आणि एजन्सी धारकावर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कडक कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी आता संपूर्ण जनतेकडून केली जात आहे.
“पुन्हा एकदा वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची उत्तम कामगिरी वेळेवर पोहोचून आगेवर नियंत्रण केले आहे ”
🙏 आता तरी प्रशासन जागे होणार का 🙏
वरोरा शहरात ग्राहकांच्या घराघरांमध्ये पोहोचणारे सिलेंडर सुरक्षित आहेत का? गॅस एजन्सीद्वारे नियमित सुरक्षा तपासणी (Safety Check) केली जाते का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पहिल्या स्फोटानंतर सुस्त राहिलेले प्रशासन आता या दुसऱ्या मोठ्या अपघातानंतर तरी जागे होणार का? की आणखी एखाद्या मोठ्या जीवितहानीची वाट पाहणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर या गॅस एजन्सीवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर वरोरावासीय प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.
🙏 जय विदर्भ 🙏




