Home Breaking News विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी नागपुरात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ चे आयोजन

विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी नागपुरात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ चे आयोजन

नागपूर :-विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नागपुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पूर्ति सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हे दोन्ही कार्यक्रम पार पडणार आहेत.
‼️१. नागपूर जलसंवाद २०२६ (पहिले सत्र)‼️
विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी ‘जलसंवर्धन हाच उपाय’ या मुख्य संकल्पनेवर आधारित एका राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संवादात देशभरातील जलतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि अनुभवी व्यक्ती एकत्र येऊन जल व्यवस्थापनावर मंथन करणार आहेत.
👉 दिनांक आणि वेळ :-१७ मे २०२६, दुपारी ४:०० वाजता
👉 स्थळ :- स्व. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
🙏 प्रमुख उपस्थिती 🙏
अध्यक्ष मा. श्री. नितीन जी गडकरी (केंद्रीय मंत्री, भारत सरकार)

👉 विशेष अतिथी :- मा. श्री. अनिल प्रकाश जोशी (पद्मभूषण प्राप्त, उत्तराखंड)

👉 मा. श्री. उमाशंकरजी पांडे (पद्मश्री प्राप्त जलयोद्धा, उत्तर प्रदेश)
👉  मा. श्री. सेठपाल सिंग (पद्मश्री प्राप्त, उत्तर प्रदेश)
👉  मा. श्री. केशव कृष्ण छत्रधारा (समन्वयक, नॉर्थ ईस्ट इंडिया)
👉 मा. श्री. संजय कश्यप (मुख्य कार्यकारी संचालक, डेटा फॉर वॉटर पीस)
* मा. श्रीमती स्व्हेडिविनो नात्सो (जल एवं पर्यावरण विशेषज्ञ, नागालँड)
👉 विशेष उपस्थिती :-मा. आशिष जयस्वाल आणि मा. डॉ. पंकज भोयर (आमदार, महाराष्ट्र सरकार)
‼️२. जलक्रांती परिषद २०२६ (दुसरे सत्र)‼️
‘जल ही जीवन है’ या भावनेला पुढे नेत, विदर्भासह संपूर्ण देशात यशस्वी ठरलेल्या ‘तामणवाडा पॅटर्न’च्या यशाचा गौरव करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या भावी दिशेवर चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘जलपर्व’, ‘जलक्रांती’, ‘कृषिकल्याण’ आणि ‘कॉरिडोर्स ऑफ वॉटर सिक्युरिटी’ या पुस्तकांचे विमोचनही केले जाणार आहे.
👉 दिनांक आणि वेळ :- सोमवार, १८ मे २०२६, सकाळी १०:०० वाजता
👉 स्थळ :- कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर.
🙏 प्रमुख उपस्थिती 🙏
अध्यक्ष :-मा. श्री. नितीन जी गडकरी (केंद्रीय मंत्री, भारत सरकार)
👉 विशेष अतिथी (प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते)  मा. श्री. नाना पाटेकर (अध्यक्ष, नाम फाउंडेशन)
👉 मा. श्री. आमीर खान (संस्थापक, पाणी फाउंडेशन)
👉  मा. श्री. मकरंद अनासपुरे (सचिव, नाम फाउंडेशन)
👉 प्रमुख अतिथी :- मा. श्री. संजय राठोड (मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र सरकार)
👉 मा. डॉ. शरद गडाख (कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
👉 मा. डॉ. प्रशांत बोकारे (कुलपती, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)
‼️ आयोजक ‼️ हा संपूर्ण उपक्रम पूर्ति सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था (जल वंधनाचा यशस्वी २५ वर्षे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून संस्थेचे अध्यक्ष श्री प्रफुल्लदत्त जामदार, सचिव श्री माधव कोटस्थाने आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी या जल-अभियानात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

🙏 जय विदर्भ🙏